पुरंदरमध्ये वाढली कोरोनाची साखळी, आज सापडले एवढे रुग्ण  

श्रीकृष्ण नेवसे
सोमवार, 29 जून 2020

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आजपर्यंतच्या 53 पाॅझीटिव्ह रुग्णांच्या निमित्ताने हाय रिस्कमधील तीनशेहून अधिक  जणांचे कोविड केअर सेंटरला विलगीकरण केले. तर, लो रिस्कमधील सातशेपर्यंत लोकांचे होम  क्वारंटाइन केले.

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोरोनाचे आज आणखी तीन रुग्ण सापडले. त्यामध्ये सासवड शहरातील एक आणि खानवडी व सोनोरी या गावात प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे सासवड शहरातील रुग्ण संख्या आज 32 वर पोचून तालुका 53 वर पोचला.  हेज दुपारपर्यंत कोरोनाबाबत विश्रांती घेतल्याचे वाटत असताना दुपारनंतर सासवडच्या सोपाननगर वसाहतीत एक व पुरंदर तालुक्यातील खानवडी आणि सोनोरी गावात प्रत्येकी एक  - एक.. असे एकुण तीन कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकाच

पोलिस अधिकाऱ्याला पाहून भडकले अजितदादा...म्हणाले..

सासवड शहरात लाॅकडाउन असतानाही कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण सापडण्यात खंड नाही. त्यामुळे आज सकाळी  प्रशासनाची तातडीची बैठक होऊन; कंटेन्मेंट झोनमधील लाॅकडाउन कायम ठेवला. तसेच, उर्वरित शहरात लाॅकडाउन व्यापाऱ्यांसह सर्व व्यावसायिकांसाठी शिथिल केला. मात्र, सासवड शहरात आणि लगतच्या गावात मिळून तीन रुग्ण सापडल्याने धोका जैसे थे असल्याचे स्पष्ट आहे. आज तीन रुग्ण पाॅझीटिव्ह सापडल्याचे तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आजपर्यंतच्या 53 पाॅझीटिव्ह रुग्णांच्या निमित्ताने हाय रिस्कमधील तीनशेहून अधिक  जणांचे कोविड केअर सेंटरला विलगीकरण केले. तर, लो रिस्कमधील सातशेपर्यंत लोकांचे होम  क्वारंटाइन केले. मुंबई कनेक्शनमधील रुग्ण सुरवातीला सापडले. आता पुणे कनेक्शनमधून व रुग्ण संपर्कातील पाॅझीटिव्ह रुग्ण सापडण्याचे सत्र थांबताना दिसत नाही.

सासवड तालुक्याची बाजारपेठ आहे. उद्या मात्र ही बाजारपेठ लाॅकडाउन शिथील होत खुली होत आहे. मात्र, शिस्त न पाळल्यास दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आठ पथके तैनात केली आहेत. धंदा शिस्त पाळूनच करण्याचे अधिकाऱ्यांनी बजावले आहे. काय पद्धतीने ग्राहक व दुकानदार  शिस्त पाळतात.. त्यावरच पुढील दिशा राहील, असे सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे व बाहेर गावी नित्यपणे जा - ये करणारांचा डाटा सर्व्हेद्वारे लगेच केला जातोय. त्यांना व्यक्तिगत काही  शिस्त पाळण्याबाबत नोटीस दिली जाईल. सासवड व परिसराचा संसर्ग रोखण्यासाठी ही उपाययोजना आणि प्रत्येक नागरीकाची शिस्तही महत्त्वाची आहे. मास्क,  सॅनेटायझर, फिजीकल-डिस्टंन्सिंग आदी न पाळल्यास  दंडात्मक कारवाई उद्यापासून वाढविणार आहे. मी स्वतःही फिरणार आहे, असे जळक यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients increased in Purandar taluka