esakal | आजीबाईंचं वय 80 आणि 35 दिवसांची कडवी झुंज! कोरोनावर इच्छाशक्तीने मात
sakal

बोलून बातमी शोधा

आजीबाईंचं वय 80 आणि 35 दिवसांची कडवी झुंज! कोरोनावर इच्छाशक्तीने मात

आजीबाईंचं वय 80 आणि 35 दिवसांची कडवी झुंज! कोरोनावर इच्छाशक्तीने मात

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी : जगभरात सध्या करोनामुळे (Corona Crisis) सर्वत्र भीतीचे वातावरण असून अनेकजण त्यात बळी पडत आहेत. परंतु इच्छाशक्ती आणि अध्यात्मिकतेच्या जोरावर धायरी येथील ठकूबाई नारायण बेनकर (वय 80) या आजीने तब्बल 35 दिवस लढा देत करोनावर मात केली आहे. (Corona Positive Story) आजीला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवाराने त्यांचे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने स्वागत केले. (Corona Positive Story Pune Grandmothers age 80 and 35 days struggle Overcome Corona by will)

हेही वाचा: vaccine:पुणे शहरात साडे सात हजार डोस वाया; पाहा व्हिडिओ

बेनकर यांना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्वरित त्यांची करोना चाचणी करून घेतली त्यात त्यांचा अहवाल करोना पॉजिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना कर्वे रस्त्यावरील संजीवन रुग्णालयात 15 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बेनकर यांना रक्तदाब आणि शर्करा आहे, त्याचबरोबर त्यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती आणि त्यांचा स्कोर 9 आला होता, त्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तब्बल 18 दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. त्यानंतर त्यांना कोविड वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले यावेळी आठ दिवस याठिकाणी उपचार घेत असताना करोना संसर्ग आटोक्यात आला होता. करोना संसर्गाची लक्षणे कमी झाल्यानंतर त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. जनरल वार्डमधील नऊ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा: जगण्याच्या उमेदीने सुर्यकांत बहिरट यांनी जिंकली कोरोनाची लढाई

यावेळी रुग्णालयात उपचार घेत असताना आजींनी सकारात्मक विचार करत आध्यत्मिकतेचा जप केला. तसेच त्यांच्या परिवाराने देखील वेळोवेळी सकारात्मक विचार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे आजीने करोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्या धायरी गावच्या माजी सरपंच आशा सुनिल बेनकर यांच्या सासू असून त्यांच्या परिवारात त्यांना तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पुणे शहराची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणाच्या आणि कात्रज येथील बोगदा निर्मितीमध्ये आजींचे योगदान आहे. तसेच त्या वारकरी संप्रदायांच्या असून त्यांनी तब्बल २३ वेळा आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाची पायी वारी पूर्ण केली आहे. विठ्ठलाची कृपा असल्यामुळे या महाभयंकर करोना संसर्गातून मुक्तता झाली. रुग्णालयात उपचार घेत असताना सातत्याने मी विठ्ठलाचा जप करत होती. तसेच माझ्या परिवाराने देखील वेळोवेळो सकारात्मक विचार करण्यास सांगितले या सर्व गोष्टींमुळे मी कोरोनाला हरवू शकले.

- ठकूबाई नारायण बेनकर, धायरी गाव, पुणे