कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण

कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण

पुणे : भारतातील विद्यार्थ्यांसमोर उच्च शिक्षणासाठी (higher education) दोन पर्याय असतात. एक तर भारतातच शिक्षण घ्यायचे किंवा परदेशात शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा. कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर परिणाम झाला असून नव्या शैक्षणिक वर्षातही त्याचे सावट राहण्याची शक्यता आहे. कोविड संसर्गाच्या काळात देशातील अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जावू इच्छित असल्याचे ‘आयस्कूलकनेक्ट’ सर्वेक्षणातून उघड झाले आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून काही मुलांनी विश्रांती घेतली असून आगामी काळात स्थितीत सुधारणा होईल, या आशेने त्यांनी शैक्षणिक योजना पुढे ढकलल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. (Corona puts Indian students in trouble stopped foreign education)

कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण
पुण्यातील भावाला थेट एलॉन मस्कचा रिप्लाय; ट्विटरवर दिलं प्रश्नाचं उत्तर
  • परदेशात जाण्याची योजना: १४. ५ टक्के

  • परदेशात जाण्यासाठी परीक्षा: जीमॅट, जीआरई, टॉफेल, सॅट, आयइएलटीएस

  • प्राधान्य देश: अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया

  • अमेरिकेस पसंती: ४२.६ टक्के

  • कॅनडाला पसंती: १६ टक्के

  • सर्वेक्षण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४२ टक्के मुले घेत आहेत ऑनलाइन शिक्षण

  • सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६ टक्के मुलांना कॅम्पसमध्ये सुरक्षित शिक्षण घेण्याची इच्छा

कोरोनामुळे भारतीय विद्यार्थी अडचणीत; रखडले परदेशी शिक्षण
PM मोदी केवळ गुजरात दौऱ्यावरच का? राऊत म्हणतात...

हायब्रिड लर्निंग मॉडेल

कोरोना महासंकटाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी जगभरातील विद्यापीठाकडून हायब्रिड लर्निंग मॉडेलची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याचा अर्थ अभ्यासक्रमाचा काही भाग वर्गात शिकवणे तर काही ऑनलाइन. विद्यार्थ्यांच्या प्रवासाविषयी आणि कोविड लसीकरणाबाबतच्या बातम्या पाहता बदल दृष्टीपथात असल्याचे दिसून येत आहे.

- आशिष फर्नांडो, संस्थापक आणि सीइओ, आयस्कूलकनेक्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com