धक्कादायक : खडकवासला येथील 8 व्यावसायिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

निलेश बोरुडे
Sunday, 20 September 2020

खडकवासला (ता. हवेली) येथील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील व्यावसायिकांची ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल आठ दुकानदार पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यावसायिकांना उपचारांसाठी नऱ्हे येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

किरकटवाडी (पुणे) : खडकवासला (ता. हवेली) येथील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील व्यावसायिकांची ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल आठ दुकानदार पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यावसायिकांना उपचारांसाठी नऱ्हे येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
        

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांमध्ये खडकवासला गावातील कोरोना रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत असून एकूण आकडा 255 वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी 194 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर 55 रुग्णांवर उपचार सुरू असून 6 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, अशी माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 खडकवासला गावाच्या हद्दीत गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायतीने ‌ 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान 'जनता कर्फ्यू' घोषित केला असून यादरम्यान टप्प्याटप्प्याने गावातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. आज 159 व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 8 व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने सदर तपासणी मोफत करण्यात येत आहे.

 

"व्यावसायिकांकडून अधिक वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने अगोदर त्यांची तपासणी करण्यात आली. 24 सप्टेंबर पर्यंत 'जनता कर्फ्यू' घोषित केला असून गावातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. तपासणी केलेल्या व्यावसायिकांची नोंद ठेवण्यात येत असून जे व्यावसायिक कोरोना तपासणी करून घेणार नाहीत त्यांना दुकाने उघडू दिली जाणार नाहीत. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या शासनाच्या उपक्रमांतर्गत 22 सप्टेंबर रोजी गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे."

-सौरभ मते, सरपंच, खडकवासला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of 8 traders from Khadakwasla is positive