डॉक्टरांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, अख्ख्या गावाचीच होणार तपासणी 

corona1
corona1

वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील वाल्हे- मकदमवाडी येथील कोरोनाबाधित व्यक्ती मागील आठवड्यात बरा होऊन घरी परतला. त्यावेळी वाल्हे गाव कोरोनामुक्त झाले होते. मात्र, ग्रामस्थांचा तो आनंद काही काळच टिकला. कारण, आज येथील खासगी वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातून वाल्हे गावाचा समावेश पुन्हा कोरोनाबाधितांच्या यादीत झाला आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस वाल्हे गावठाण प्रतिबंधितक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

वाल्हे ग्रामस्थांनी कोरोनाबाधित व्यक्ती गेल्या आठवड्यातच कोरोनामुक्त होऊन परतल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला होता. त्यामुळे गावातील बाजारपेठ देखील बऱ्यापैकी खुली झाली होती. मात्र, आज येथे एक खासगी वैद्यकिय व्यावसायिक करणारी डॉक्टर व्यक्तीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, कोरोना दक्षता समिती यांनी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षक आदींच्या मदतीने संपूर्ण गावाची तातडीने तपासणी सुरू केल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली. 

वाल्हे येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने तालुक्याची रूग्ण संख्या 427 वर जाऊन पोहचली आहे. तर, वाल्हे व परिसरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने तहसीदार रूपाली सरनौबत यांनी तातडीने भेट देऊन संबंधित सर्व 
यंत्रणेला मार्गदर्शन करून सुचना केल्या. त्यानुसार आजपासून पुढील तीन दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून संपूर्ण गावाची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या थेट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. तपासणीसाठी येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये, जेष्ठ नागरिक व दहा वर्षाच्या आतील लहाने मुले यांना वैद्यकिय कारणाशिवाय बाहेर पडू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
    
या वेळी गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, सरपंच अमोल खवले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, सचिन लंबाते, सुर्यकांत भुजबळ, तलाठी नीलेश अवसरमोल, पोलिस हवालदार हनुमंत गार्डी, बी. व्ही. जगदाळे, आरोग्य सेविका धनश्री राऊत आदि उपस्थित होते.
    
नागरिकांसाठी सूचना
तोंडाला मास्क न लावणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे व विनाकारण दुचाकीवर दोघे फिरणारे आदींना पाचशे ते हजार रूपये दंड ठोठावणार असून, जर कोणी व्यावसायिकाने दुकान उघडल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले. तसेच, कोरोना प्रतिबंधितक्षेत्र हे ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लॅन्ट शेजारी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वाल्हेकरांनी फिल्टर प्लॅन्टकडे न येता घरी नळाला येणारे पाणी उकळून गार करून प्यावे. बाहेरून आल्यानंतर हातपाय साबणाने स्वच्छ धुऊनच घरात प्रवेश करावा, असे ग्रामपंचायत प्रशासनकडून आवाहन करण्यात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com