esakal | भोरवरून बारामतील आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट....
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

खंडोबाचीवाडी येथील 45 वर्षीय व्यक्ती भोर येथे सरकारी सेवेत आहे. त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यानेही स्वतःहून चाचणी केली, मात्र

भोरवरून बारामतील आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे रिपोर्ट....

sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील कोरोनाचे तीनही संशयित निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसर अद्यापही तांत्रिकदृष्ट्या कोरोनामुक्त राहिला असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

खंडोबाचीवाडी येथील 45 वर्षीय व्यक्ती भोर येथे सरकारी सेवेत आहे. त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यानेही स्वतःहून चाचणी केली, मात्र कुठलीही लक्षणे जाणवत नसल्याने तो गावी खंडोबाचीवाडी येथे आला होता. गावी आल्यावर त्याला चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे समजले. दोन्ही तालुका प्रशासनाच्या चर्चेनंतर त्यास बारामती येथेच उपचार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांची पत्नी व दोन मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. ते तिघेही आज निगेटीव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, सोमेश्वरनगर परिसर अद्यापही कोरोनामुक्त राहिला आहे. मागील आठवड्यात आढळून आलेला मुरूम येथील कोरोना रुग्ण सध्या पुणे येथे रहात होता. त्याची चाचणी व उपचार पुण्यातच केल्याने तो तिथेच समाविष्ट करण्यात आला आहे. त्याच्या चार दिवसाच्या मुरूम मुक्कामावेळी संपर्कात आलेले तिघेही निगेटीव्ह आले होते. आता खंडोबाचीवाडी येथील रुग्णही भोरला सेवेत असून, तेथेच चाचणी केल्याने भोरच्या यादीत समाविष्ट झाला आहे. त्याच्या संपर्कातील खंडोबाचीवाडीचे लोक निगेटीव्ह आले. त्यामुळे दोन कोरोनाबाधित परिसरात फिरूनही परिसर कोरोनामुक्त राहिला आहे. परंतु, दारात कोरोना आल्याने करंजेपूल, वाणेवाडी या व्यापारी पेठांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
 
Edited by : Nilesh Shende