भोरमधील आणखी दोन तरुणांचे कोरोना अहवाल आलेत... 

corona
corona

भोर (पुणे) : भोर तालुक्‍यातील वरोडी खुर्द आणि रायरी ग्रामपंचायतीमधील धारंबेवाडी येथील प्रत्येकी एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. मंगळवारी (ता. 26) दुपारी दोन्ही तरुणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन्हीही तरुण हे काही दिवसांपूर्वीच मुंबईहून आपापल्या गावी आले होते. 

भोर तालुक्‍यात गुरुवारी (ता. 21) रायरीतील एकजण कोरोनाग्रस्त झाल्यानंतर रविवारपासून (ता. 24) दररोज दोन रुग्णांची भर पडत आहे. रविवारी रायरीतील कोरोनाग्रस्ताची पत्नी व दोन मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी (ता. 25) रायरीतील रेणुसेवाडी येथील एकजण आणि मानकरवाडी येथील एकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आज (ता. 26) धांरबेवाडी आणि वरोडी खुर्द येथील आणखी दोन तरुणांची भर पडली. 

कोरोनाग्रस्त झालेले सर्वजण मुंबईहून भोरला आले होते. त्यामुळे तालुक्‍यात राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्‍यावर कोरोनाची तलवार लटकलेली असून, कोरोनाग्रस्तांबरोबर इतरांनीही योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. मुंबईहून आलेल्या सर्वांनी क्वारंटाइनची योग्य खबरदारी घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारंटाइन आणि आवश्‍यक त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com