कार्यक्रमात गर्दी होऊ नये म्हणून अजित पवारांचा नवा फंडा | Deputy Chief Minister Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deputy Chief Minister Ajit Pawar
...अन अजित पवार यांनी साधला समतोल

कार्यक्रमात गर्दी होऊ नये म्हणून अजित पवारांचा नवा फंडा

बारामती : कोरोनाच्या निर्बंधाच्या (Corona restrictions) पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनीही आज आपल्या कार्यक्रमात अचानकच बदल केले. आज सकाळीच बारामतीत त्यांनी गर्दीच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला होता. आपल्याच कार्यक्रमाला गर्दी होईल या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी जात कार्यक्रम संपन्न केला. स्थानिकांचा आग्रह न मोडता नियमांचेही पालन करत अजित पवारांनी समतोल साधण्याचा आज प्रयत्न केला.

हेही वाचा: सरकारने वेळीच कायद्याची अंमलबजावणी नाही केली तर समुद्रात राडे होतील

बारामतीतील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उदघाटन आज (ता. 2) अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना 50 पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थितीवर बंधने आणली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्रमाला गर्दी होईल या अपेक्षेने अजित पवार तासभर अगोदरच कार्यक्रम स्थळी पोहोचले, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी हा कार्यक्रम संपन्न केला. औपचारिकता बाजूला ठेवत डॉ. आशिष जळक यांच्या स्नेहभावामुळेच कार्यक्रमाला आल्याचे सांगून त्यांनी जळक कुटुंबियांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.

जळक कुटुंबियांच्या सामाजिक योगदानाची प्रशंसा अजित पवार यांनी केलीच पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच नियमांचे पालन करायला हवे, असे सांगायला ते विसरले नाहीत.

हेही वाचा: पुणे : विकासकामात लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित असावे; रामदास आठवले

आज सकाळीच अजित पवार यांनी शासकीय निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या कार्यक्रमांना गर्दी होणार असेल तर जाणारच नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र स्थानिकांच्या आग्रहामुळे अजित पवार यांनी मध्यम मार्ग काढत लोक जमा होण्यापूर्वीच कार्यक्रमस्थळ गाठून कार्यक्रम पार पाडून ते झटपट निघून गेले.

एकीकडे नियमांचे उल्लंघन होऊ नये व दुसरीकडे स्थानिकांचा विरस होऊ नये अशी दुहेरी कसरत पार पाडत मध्यम मार्ग काढून अजित पवारांनी बँलन्स साधल्याची चर्चा बारामतीत आज होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top