
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव(Corona) रोखण्यासाठी शहरात लागू करण्यात आलेल्या निर्बंध महापालिकेच्या (PMC) सोयीचा ठरला आहे. दाटवस्तीच्या भागातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याने गेल्या महिन्याभरात समान पाणी पुरवठा योजनेतील(Equal Water Distribution Scheme) सुमारे ५५ किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम करता आले. त्यामुळे दोन वर्षांत ४३२ किलोमीटर लांबीच्या, तर एक महिन्यात ५५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे (Waterways Work) काम पूर्ण झाले आहे. (Corona restrictions speed up the work of water supply scheme of 55 kilometres waterways in 2 months)
शहरातील पाण्याची गळती कमी करण्याबरोबरच सर्व भागात समान पाणी पुरवठा करण्यासाठीची योजना २०१८ मध्ये महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी शहरातील जुन्या बदलून नवीन जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु शहराच्या मध्यवस्ती भाग जलवाहिन्या टाकण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. त्यासाठी पोलिस परवानगी आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात अनेक अडचणी येत होत्या. परंतु त्या सगळ्या अडचणी सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे दूर झाल्या आहेत. परिणामी बाजारपेठेचा आणि अत्यंत वर्दळीचा भागात जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यावर प्रशासनाने भर दिला. यामुळे ही कामे जलदगतीने मार्गी लागण्यात मदत होत आहे.
''समान पाणी पुरवठा योजनेतंर्गत वर्दळ आणि दाटवस्ती असणाऱ्या भागात लॉकडाउनच्या कालवधीत जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे. तुलनेने वाहतूक कमी असल्याने हे शक्य झाले आहे. गेल्या महिन्याभराच्या कालवधीत सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.''
- अनिरुद्ध पावसकर, पाणी पुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.