पुणेकरांनो, सावधान! बघता बघता निम्म्या जिल्ह्यात पसरला कोरोना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

आजघडीला पुणे जिल्ह्यातील तेरा पैकी सात तालुक्यात या विषाणूचा संसर्ग झाला आहे. उर्वरित सहा तालुके अद्यापही सुरक्षित आहेत. या सहा तालुक्यांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.      

पुणे : कोरोना विषाणू संसर्ग हा आता महानगरांपुरताच मर्यादित राहिलेला नसून हळूहळू तो आता ग्रामीण भागातही पसरू लागला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील तेरापैकी सात तालुक्यात कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे बघता बघता निम्म्या पुणे जिल्ह्याच्या कोरोनाने पाय रोवले आहैत. त्यामुळे याबाबत ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीही अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.        
                       
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
राज्यातील पहिला रुग्ण पुणे शहरात ९ मार्चला सापडला होता. त्यानंतर दुसऱ्या च दिवशी म्हणजे १० मार्चला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिला रूग्ण हा हवेली तालुक्यातील मांजरी येथे सापडला होता. हा तालुका पुणे शहरालगत आहे. त्यामुळे त्यानंतरचे काही रुग्ण याच तालुक्यात सापडले होते. परिणामी कोरोना विषाणू संसर्ग हा शहरापुरताच मर्यादित राहील, अशी अटकळ आरोग्य विभागाकडून बांधली जात होती. पण ही अटकळ सपशेल कोटी ठरली आहे. कोरोना विषाणूने २२ मार्चपर्यंत हळूहळू एकेका तालुक्यात शिरकाव करण्यास सुरुवात केली.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 
आजघडीला पुणे जिल्ह्यातील तेरा पैकी सात तालुक्यात या विषाणूचा संसर्ग झाला आहे. उर्वरित सहा तालुके अद्यापही सुरक्षित आहेत. या सहा तालुक्यांनी कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.    
 
#Lockdown2.0 : गायत्रीने केले वडिलांचे घरीच केशकर्तन       
पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरूर, बारामती, भोर, वेल्हे, मुळशी आणि जुन्नर या सात तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आले आले आहेत. उर्वरित इंदापूर, मावळ, पुरंदर, दौंड, खेड आणि आंबेगाव या सहा तालुक्यात अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona spread across seven of the 13 talukas in Pune district