धक्कादायक, दिल्लीवरून शिरूरला परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोना  

दत्तात्रेय कदम
बुधवार, 27 मे 2020

शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

मांडवगण फराटा (पुणे) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तो आठ दिवसांपूर्वी दिल्ली येथून आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. मांडवगण फराटा हे या परिसरातील मोठी बाजारपेठ असलेले गाव असल्याने या भागात खळबळ उडाली असून, नागरिक भयभीत झाले आहेत.

बारावीचा अभ्यासक्रम बदललाय; असे झाले बदल...

मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील कोरोना संसर्ग झालेला विद्यार्थी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची ( UPSC ) तयारी करण्यासाठी गेलेला होता. केंद्र सरकारने एका विशेष रेल्वेने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना इकडे पाठवले होते. 

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

या विद्यार्थ्यांबरोबर तो आला होता. १९ मे रोजी घरी आल्यावर त्याला ताप, घशात खवखव व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. अशातच त्याच्या बरोबर आलेल्या कोल्हापूर येथील मित्राची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या मित्राने फोनवरून ही माहिती दिली होती. त्यामुळे या विद्यार्थ्याला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या तरुणाला ताप व थोडा घसा दुखत असल्याने त्याला नोबेल रुग्णालयाला पाठविले होते. त्याची टेस्ट केल्यानंतर करोना संसर्गाची लक्षणे दिसून आली होती. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला.

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

या तरुणाला पुढील उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आले आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेले नातेवाईक, मित्र यांना होम क्वारंटाइन केले असून, सर्वांच्या आरोग्याकडे आरोग्य अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. येथे लॉकडाऊन असतानाही नागरिक गंभीर नव्हते. परंतु, आता मात्र सर्व नागरिक हादरले आहेत. महसूल विभागाने मांडवगणच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona to a student returning to Shirur from Delhi