कोरोना संशयिताचा रिपोर्ट आला...

डी. के. वळसे-पाटील
शुक्रवार, 1 मे 2020

- नुमने पाठविण्यात आले होते पुण्याला.

मंचर : कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्याला पाठवलेल्या कळंब (ता.आंबेगाव) येथील संशयिताचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंदा राणी पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कळंब येथील संबंधित व्यक्तीचा मुलगा व सून नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. पंधरा दिवसापूर्वी दोघांचीही तपासणी निगेटिव्ह आली होती. पण सदर मुलाचे वडील यांचीही ही तपासणी करावी, अशी मागणी झाली होती .संबंधित व्यक्तीला तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले होते .आंबेगाव तालुक्यातील प्रशासन व कळंबचे गावकरी चिंतेत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खबरदारीचा उपाय म्हणून कळंब गावात तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत व प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने व कळंबच्या गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Suspected Patient Report is Negative