esakal | राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 

बोलून बातमी शोधा

राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 

चीनसह कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या 24 देशांमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या 38 हजार 131 प्रवाशांची तपासणी महिनाभरात करण्यात आली. त्यापैकी कोरोनाची लक्षणे आढळलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 64 पैकी 60 जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याची माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (एनआयव्ही) राज्याच्या आरोग्य खात्याला देण्यात आली. 

राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - चीनसह कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या 24 देशांमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या 38 हजार 131 प्रवाशांची तपासणी महिनाभरात करण्यात आली. त्यापैकी कोरोनाची लक्षणे आढळलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 64 पैकी 60 जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याची माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (एनआयव्ही) राज्याच्या आरोग्य खात्याला देण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. याचा संसर्ग देशातील लोकांना होऊ नये, याची खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेण्यात आली आहे. त्यासाठी कोरोना बाधित देशांमधून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी विमानतळावरच करण्यात येते. प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यातून आतापर्यंत 38 हजार रुग्णांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली. तसेच, बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 220 प्रवासी आले आहेत. 

रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 64 प्रवाशांपैकी 59 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या दोन जण मुंबईत, तर तीन जण सांगलीमधील रुग्णालयात भरती आहेत. नवीन कारोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून, राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 खाटा उपलब्ध आहेत. 

138 प्रवाशांचा 14 दिवस पाठपुरावा 
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 220 प्रवाशांपैकी 138 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.