रेल्वे रुग्णालयातील ७० टक्के स्टाफला कोरोना; परंतु, बरं झाल्यावर पूर्ण स्टाफ पुन्हा कार्यरत

कोरोनाची लागण झालेल्या १६०० कर्मचाऱ्यांवर रेल्वे रुग्णालयात यशस्वी उपचार झाले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे ठरले आहे.
Doctor
DoctorSakal

पुणे - कोरोनाची लागण (Corona Infection) झालेल्या १६०० कर्मचाऱ्यांवर रेल्वे रुग्णालयात (Railway Hospital) यशस्वी उपचार (Treatment) झाले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे ठरले आहे. रुग्णालयामार्फत कोरोनाच्या सुमारे दोन हजार चाचण्या घेण्यात आल्या. या रुग्णालयातील सुमारे ७० टक्के डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. परंतु, बरं झाल्यावर हा सगळा स्टाफ (Staff) पुन्हा नव्या जोमाने कार्यरत झाला आहे. (Corona to 70 Percent Staff at Railway Hospital After Recovery Full Staff is Working Again)

पन्नास बेडच्या या रुग्णालयावर १० हजार रेल्वे अधिकारी, कर्मचारी, पाच हजारांहून अधिक निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसह सुमारे ५० हजार जण अवलंबून आहेत. सध्या बेडची संख्या २५ ने वाढविली आहे. रुग्णालयात २६ कोविड ऑक्सिजन, १० आयसीयू व्हेंटिलेटर बेड, १५ ऑक्सिजन बेड कोरोना संशयितांसाठी आणि अन्य २४ बेड नेहमीच्या आजारांसाठी आहेत.

Doctor
पुण्यात तयार होणार Sputnik-V; सीरमला DCGIची परवानगी

मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय आठवले म्हणाले, ‘दुसऱ्‍या लाटेमध्ये रुग्ण वाढू लागले, तरीही आमच्या रुग्णालयात मध्यम दर्जाची संपूर्ण व्यवस्था होती. आम्ही लसीकरण केंद्रही सुरू केले असून याचा फायदा रेल्वे कर्मचाऱ्‍यांसह सामान्य जनतेला होत आहे. काही दिवसातच स्वयं-निर्मित ऑक्सिजन प्लँट उभारणार आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com