
कोरोनाचं संकट पुण्यात पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. गेल्या आठवड्यात असणारा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पुणे - कोरोनाचं संकट पुण्यात पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. गेल्या आठवड्यात असणारा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक पार आज पडली. महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्तांसह आरोग्य विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला तरी मोठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच चार वॉर्ड ऑफीस परिसरात कंटेन्मेंट झोनचा विचारही महापालिका करत असल्याची माहिती समोर येत आहे.
महापौर काय म्हणाले
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात आयसीयूसह सर्व प्रकारचे १ हजार १६३ शासकीय बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांना कोरोनाचे अतिरिक्त बेड्स उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मास्कसंदर्भात पुण्यातही कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
मंगळवारी नवीन रुग्णांमध्ये वाढ
पुणे शहरातील मंगळवारी दिवसभरातील नवीन रुग्णांचा तीनशेचा आकडा एक दिवसाच्या खंडानंतर पुन्हा ओलांडला. मंगळवारी शहरात 309 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात 638 रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील केवळ एक रुग्ण आहे.
हे वाचा - पुण्यात थंडीची एक्झिट; पुढील ३ दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता
शहरातील सर्वाधिक नवीन रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये १४२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १२७, नगरपालिका कार्यक्षेत्रात ५४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात ५२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २७२, पिंपरी चिंचवडमधील ३६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १६३, नगरपालिका क्षेत्रातील ४३ आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे.