esakal | पुणेकरांनो, या 16 केंद्रांवर मिळणार कोरोनावरील लस
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine at 16 centers in Pune

सर्वाधिक लसीकरण केंद्रे मुंबईत असून त्यांची संख्या 72 आहे. त्या खालोखाल पुण्यात 55 लसीकरण केंद्रे आहेत. यात पुणे शहरात 16, पिंपरी-चिंचवडमध्ये 16 व जिल्ह्यातील 23 केंद्रांचा समावेश आहे.

पुणेकरांनो, या 16 केंद्रांवर मिळणार कोरोनावरील लस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतात येत्या 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून पुणे महापालिका प्रशासनाने पुण्यात 16 लसीकरण केंद्रे उभारली आहेत. पुण्यातील सिरममधून सर्व केंद्राना पुरवठा होणार असून आज मंगळवारी सकाळपासून ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली गेली आहे.

राज्यात पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला होता. या पार्श्‍वभूमीवर येथील लसीकरणाकडे लक्ष लागले आहे. राज्यातील आठ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याची व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाने पूर्ण केली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून ५११ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

सर्वाधिक लसीकरण केंद्रे मुंबईत असून त्यांची संख्या 72 आहे. त्या खालोखाल पुण्यात 55 लसीकरण केंद्रे आहेत. यात पुणे शहरात 16, पिंपरी-चिंचवडमध्ये 16 व जिल्ह्यातील 23 केंद्रांचा समावेश आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग मिळून सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोस पाठविण्यात येणार येतील.

कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्‍सिन लस पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रापर्यंत लस वितरणासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सीरम इन्स्टिट्युटमध्ये गेले. तेथे ट्रकमध्ये लसीचे डोस अपलोड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, आज हे तीन ट्रक रवाना झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पुण्यातील 16 लसीकरण केंद्रांची यादी
1. रुबी हॉल क्लिनिक
2.जोशी हॉस्पिटल
3. नोबल हॉस्पिटल
4. भारती हॉस्पिटल
5. दिनानाख मंगेशकर हॉस्पिटल
6. दळवी हॉस्पिटल
7. कै. एन जी शिवरकर हॉस्पिटल
8. सुतार मॅटरनिटी होम
9. कै. सदाशिव एकनाथ निम्हण मॅटरनिटी होम
10. बी. जे  मेडिकल कॉलेज
11. कै. बाळासाहेब ठाकरे अर्बन हेल्थ केअर सेंटर 
12. कमला नेहरु हॉस्पिटल 
13. कलावती मावळे
14. राजीव गांधी हॉस्पिटल
15. संदगुरु शंकर महाराज अर्बन हॉस्पिटल
16. जम्बो हॉस्पिटल, शिवाजीनगर


युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय