esakal | कोरोनाचा ससंर्ग वाढतोय; बारामतीत प्रशासनाने दिले खबरदारीचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Mask

राज्याच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बारामतीतही आता खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज या बाबत माहिती दिली. मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

कोरोनाचा ससंर्ग वाढतोय; बारामतीत प्रशासनाने दिले खबरदारीचे आदेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती - राज्याच्या अनेक भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने बारामतीतही आता खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आज या बाबत माहिती दिली. मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. दरम्यान काल बारामतीत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी अधिका-यांची तातडीची बैठक घेतली. तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे, डॉ. सुनील दराडे, पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, डॉ. संजय पुरंदरे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णांची तपासणी टाळू नका
बैठकीत या पुढील काळात डॉक्टरांनी शंका वाटल्यास तातडीने रुग्णाची कोरोना तपासणी करण्याचे निर्देश कांबळे यांनी दिले आहेत. कोणत्याही स्थितीत रुग्णांची तपासणी टाळू नका असे वैद्यकीय व्यावसायिकांना सांगितले गेले आहे.  पुणे मुंबईसह अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामतीत अजूनही आकडा वाढत नसला तरी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या मुळे आता मास्कचा वापर बारामतीत अनिवार्य असेल असे शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. 

जंगी मिरवणूक भोवली, गजा मारणेसह नऊ जणांना न्यायालयीन कोठडी

कोरोनाचे नियम धाब्यावर
मास्कचा वापर करण्यासोबतच सर्व संस्था, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांच्यासह ज्यांच्याकडे गर्दी होते, अशा सर्व आस्थापनांमध्ये सॅनेटायझरचा वापर करण्यासोबतच  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. बारामतीतही अनेक ठिकाणी सर्रासपणे विनामास्क लोक फिरतात, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याची स्थिती आहे. बहुसंख्य ठिकाणी आता सॅनिटायझरचा वापर व थर्मल स्क्रिनींगही थंडावले आहे. पूर्वी येणा-यांची नोंद ठेवली जायची, आता तीही ठेवली जात नाही.

शक्त्री प्रदर्शन प्रकरण - गुंड शरद मोहोळसह साथीदारांना जामीन

कोरोना रुग्ण आता संस्थात्मक विलगीकरणात
या पुढील काळात ज्यांना कोरोना होईल त्यांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात 14 दिवस ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गृह विलगीकरणात पुरेशी काळजी घेतली जात नाही, रुग्ण इतरांच्य संपर्कात येत असल्याचे दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil