आता आणखी काळजी घ्या - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पुणे - ‘ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज आहे,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले.  प्रशासकीय पातळीवर आवश्‍यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

‘कोविड-१९’ व्यवस्थापनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संसर्गाचा दर व मृत्यूदर कमी होत असल्याचे सांगतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.

कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम!

डॉ. खेमणार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. तर  हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

अजित पवार म्हणाले...

  • कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्‍यक आहेत 
  • दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घ्यावी लागणार आहे 
  • त्यादृष्टीने प्रत्येक यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे 
  • अत्यावश्‍यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी
  • गरजू रुग्णांना आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घ्यावी
  • नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर या नियमांचे पालन करावे
  • अनावश्‍यक गर्दी टाळण्यासोबतच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Now be even more careful Ajit Pawar