नववर्षात पर्यटन करताय? कोरोना अजुनही आहे विसरु नका!

Corona Virus Take Care While Travelling in News Year
Corona Virus Take Care While Travelling in News Year

पुणे : संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग हा सुरूच आहे. त्यामुळे पर्यटकांनी कोरोनाचे भान ठेवूनच नववर्षाचे स्वागत करावे. तसेच, राज्यात सध्या रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा नववर्षानिमित्त होणाऱ्या पर्यटनावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तथापि पर्यटकांना सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ (एमटीडीसी) सज्ज झाले आहे. 

नववर्षाच्या स्वागतासाठी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एमटीडीसीची पर्यटक निवासस्थाने आणि उपहारगृहांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. रिसॉर्टवर तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज स्प्रे, ऑक्‍सीमिटर, मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग आणि अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे. सर्व पर्यटक निवासे शंभर टक्के फुल्ल झाली आहेत. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत. 

पर्यटकांचा ओढा निसर्गाकडे 
पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोणावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओढा आहे. तसेच, शिवशंकराच्या सानिध्यात महामंडळाच्या भीमाशंकर पर्यटक निवासातही पर्यटक गर्दी करीत आहेत. रात्री 11 नंतर संचारबंदी असल्यामुळे आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन करून पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले. 

''संचारबंदीच्या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पर्यटनावर परिणाम होण्याची शक्‍यता असली तरी पर्यटनाची ओढ सर्वांना निसर्गाकडे खेचून नेत आहे. महामंडळाची रिसॉर्टस्‌ खुली असून पर्यटकांना उत्तम दर्जाची सुविधा देण्यासाठी तत्पर आहोत.''
- दीपक हरणे, व्यवस्थापक, एमटीडीसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com