esakal | मंचर उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाण : ३ जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Corona warriors beat doctor at Manchar sub district hospital

मंचर पोलिसांनी संदेश मधुकर साळवे यांच्यासह तिघांच्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कमल मधुकर साळवे (वय ६५ रा. कळंब ता.आंबेगाव) या कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असताना मयत  झाल्या .ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना  मोबाईलद्वारे कळविली.

मंचर उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाण : ३ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
डी.के .वळसे पाटील

मंचर : “मंचर उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना योद्धे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश नारायण गुडे (वय 43) कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात  घालून आपल्या कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहून सामान्यांसाठी दिवस-रात्र काम करत आहेत. त्यांच्यासाठी फुलांचा वर्षावही नागरिकांनी केला होता. पण, शुक्रवारी (ता.२) रात्री त्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण झाल्याची घटना मंचरला  घडली आहे.या घटनेचे तीर्व पडसाद आंबेगाव तालुक्यात  उमटले असून नागरिक  व खासगी डॉक्टरांनीही संताप व्यक्त करून या घटनेचा निषेध केला आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर पोलिसांनी संदेश मधुकर साळवे यांच्यासह तिघांच्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कमल मधुकर साळवे (वय ६५ रा. कळंब ता.आंबेगाव) या कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असताना मयत  झाल्या .ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना  मोबाईलद्वारे कळविली. त्यांचा मुलगा संदेश साळवे याने डॉ.गुडे यांना मोबाईलद्वारे शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यासोबत इतर दोन ते तीन जण प्रतिबंध असताना कोविड वार्डच्या पहिल्या मजल्यावर गेले. त्यांना डॉ. गुडे समजावून सांगत होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी डॉ.गुडे  यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.ही माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंबादास देवमाने यांनी पोलिसांना कळविली.पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे हे रुग्णालयात तातडीने आले. सरकारी कामात अडथळा, मारहाण, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग अशी  फिर्याद डॉ.गुडे  यांनी मंचर पोलीस ठाण्यात दाखल केली.

आरोपी संदेश साळवे हा डॉ.महेश गुडे यांना मारहाण करत असताना ड्यूटीवर असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.अलकनंदा रेड्डी- गुडे ह्या मध्ये पडल्या पण, आरोपी आक्रमक होते. कोरोना बाधित ६५ वर्षीय महिला देखील डॉ.गुडे यांच्या मदतीसाठी धावून गेली.त्यानंतर डॉ. गुडे यांची  सुटका झाली.

शरद पवार संतापले; 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, यावर कवडीचा विश्वास राहिला नाही!'

“आरोपींना ताबडतोब अटक करावी.या मागणीसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिका,खासगी डॉक्टर यांची शनिवारी (ता.३) सकाळी डॉ.देवमाने व उपपोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे यांच्या  उपस्थितीत बैठक झाली.यावेळी आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोशियेशनचे अध्यक्ष डॉ.संतोष शिंदे ,डॉ.सुदाम खिलारी, डॉ. सुनील खिवसरा डॉ.संजय भवारी, डॉ.कैलास भागवत , रुग्नाकल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, दत्ता थोरात यांनी तीर्व भावना व्यक्त करून हल्ल्याचा निषेध केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी आरोपींच्या विरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मंचर पोलिसांना दिले. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचेही टोम्पे यांनी सांगितले.”

 दरम्यान शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा ,आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी , माजी सरपंच दत्ता गांजाळे , मंचर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय घुले  यांच्यासह अनेक संघटनांनीही  भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. 

पुण्यात शिवसेना नेत्याच्या हत्येनं खळबळ; मध्यरात्री धारधार शस्त्रांनी हल्ला

शहा म्हणाले “पुण्यात पहिल्या मिळालेल्या कोरोनाबाधित कँब चालक रुग्नासह ५०० रुग्णांना नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे काम डॉक्टर गुडे दांपत्याने केले आहे.गेली सहा महिने कुटुंबापासून दूर राहून जीव धोक्यात घालून सर्वच डॉक्टर काम करतात.आरोपीच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी. 

loading image
go to top