कोरोनाचे निदान आता होणार जलद गतीने

पुणे - आरटी-पीसीआर पद्धतीच्या स्वयंचलित चाचण्यांचे यंत्र मायलॅबने विकसित केले आहे. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी (डावीकडून) शैलेंद्र कवाडे, हसमुख रावल, आदर पूनावाला, सुजीत जैन, सायरस पूनावाला, अभिजित पवार.
पुणे - आरटी-पीसीआर पद्धतीच्या स्वयंचलित चाचण्यांचे यंत्र मायलॅबने विकसित केले आहे. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी (डावीकडून) शैलेंद्र कवाडे, हसमुख रावल, आदर पूनावाला, सुजीत जैन, सायरस पूनावाला, अभिजित पवार.

पुणे - कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचे निदान आता अधिक विश्‍वासार्ह आणि जलद गतीने होणार आहे. कोरोनाची चाचणी अधिक कमी जागेत, कमी मनुष्यबळात आणि जलदगतीने होण्यासाठीचे नवे यंत्र पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स कंपनीने विकसित केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिव्हर्स ट्रान्सफॉर्म पॉलिमर चेन रिऍक्‍शन (आरटी-पीसीआर) पद्धतीच्या कोरोनाच्या एकाचवेळी अनेक चाचण्या स्वयंचलित पद्धतीने या यंत्रातून घेता येतील. अशा स्वरुपाचे देशातील हे पहिले यंत्र आहे, असा दावा कंपनीने आज येथे पत्रकार परिषदेत केला. 
‘कॉम्पॅक्‍ट एक्‍स-एल’ नावाच्या या यंत्राचे अनावरण करताना मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले, ‘पूर्णतः स्वदेशी असलेल्या या यंत्राच्या माध्यमातून देशाला वैद्यकीय निदानामध्ये अग्रेसर करण्याचा प्रयत्न आहे. ‘कॉम्पॅक्‍ट एक्‍स-एल''हा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. स्वयंचलित पद्धतीमुळे निदानाची अचूकता वाढणार आहे.’

‘कॉम्पॅक्‍ट एक्‍स-एल’ची वैशिष्ट्ये -
- स्वयंचलित पद्धतीने नमुन्यांचे एक्‍स्ट्रॅक्‍शन आणि पीसीआर सेटअप शक्‍य 
- एकाच वेळी वेगवेगळ्या नमुन्यांच्या विविध मापदंडांची माहिती मिळणार 
- प्रयोगशाळेचा दैनंदिन खर्च कमी होणार 
- यंत्रातील रोबोटीक्‍स यंत्रणेची कार्यक्षमता उच्चस्तरीय 
- मानवी श्रम आणि चुक कमी करणारी स्वयंचलित पद्धत 
- प्लाझ्मा, पेशी, थुंकी आणि घशातील द्रव पदार्थ अशा विविध नमुन्यांद्वारे निदानाची सुविधा 

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवे संशोधन कोरोनाविरुद्धच्या लढाईला मोठे बळ देत आहे. नवे यंत्र क्रांतिकारी आहे आणि त्यासंदर्भात विविध पेटंट आम्ही सादर केली आहे. चाचण्या सर्वदूर पोहोचविण्याच्यादृष्टीने नवे यंत्र मोठी झेप आहे. चाचण्यांची मागणी आणि पुरवठ्यात समन्वय साधला जाईलच, पण त्याचबरोबर मनुष्यबळाचा तुटवडाही भरून निघेल. 
- आदर पूनावाला, सीईओ, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. 

कोविडने काय दिले असेल तर, स्वयंपूर्णतेचा धडा! नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. परवडेल अशा दरात निदानाचे तंत्रज्ञान उपलब्ध  करण्याचा प्रयत्न मायलॅब करत आहे. वैद्यकीय निदानामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने ‘कॉम्पॅक्‍ट एक्‍स-एल’ हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. 
- अभिजित पवार, अध्यक्ष, एपी ग्लोबाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com