Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

जनार्दन दांडगे
Wednesday, 22 April 2020

उरुळी कांचन येथील कोरोना बाधीत महीलेवर लोणी काळभोर येथील खाजगी रुग्नालयात उपचार चालु असताना, उपचारा दरम्यान संपर्कात आलेल्या अ़डतिस पैकी तब्बल अठ्ठाविस जनांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात संबधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टव व कांही नर्सेसचा समावेश आहे. तर उर्वरीत दहा जनांचा अहवाल  आज बुधवारी (ता. 22) सायंकाळी येण्याची शक्यता आहे अशी माहिती रुग्नालय प्रशासनाने दिली आहे.

लोणी काळभोर - उरुळी कांचन येथील कोरोना बाधीत महीलेवर लोणी काळभोर येथील खाजगी रुग्नालयात उपचार चालु असताना, उपचारा दरम्यान संपर्कात आलेल्या अ़डतिस पैकी तब्बल अठ्ठाविस जनांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात संबधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टव व कांही नर्सेसचा समावेश आहे. तर उर्वरीत दहा जनांचा अहवाल  आज बुधवारी (ता. 22) सायंकाळी येण्याची शक्यता आहे अशी माहिती रुग्नालय प्रशासनाने दिली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान संबधित महिलेच्या संपर्कात आलेले उरुळी कांचन येथील तिचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर व दुध, भाजीपाला पुरवणारे वोक असे अठराजणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने, आरोग्य विभाग, उरुळी कांचन, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर अशा तिन ग्रामपंचायतीचे प्रशासन व वरील गावातील नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. 

उरुळी कांचन येथील एक महिला मागिल शुक्रवारी (ता. 17) लोणी काळभोर येथील खाजगी रुग्नालयात उपचार घेत असताना, कोरोना बाधीत असल्याचे आढळुन आले होते. ही बाब लक्षात येताच, संबधित महिलेवर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्नालय प्रशासनाने संबधित महिलेले पुढील उपचारासाठी पुणे येथील नायडु रुग्नालयात हलविण्याबरोबरच, संबधित महिलेवर उऊपचार करणारे डॉ्कटर, नर्स, व रुग्नालयातील कांही स्टाफ अशा अडतीस जनांना रुग्नालयाच्या सहाव्या मजल्यावर कोरोटांईन केले होते. कोरोनाटांईन केलेल्या अडतीस जनांच्या घशातील द्रव कोरोना चाचनीसाठी पाठवले होते. अडतीसपैकी अठ्ठाविस जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असुन, उर्वरीत दहा जनांचा अहवाल आज रात्री पर्यंत येणार असल्याची माहिती रुग्नालय प्रशासनाने दिली आहे. 

केंद्रिय पथक आज (बुधवारी) दुपारी उरुळी कांचनला
दरम्यान उरुळी कांचन येथे एक महिला कोरोनाग्रस्त सापडल्याच्या प्रार्श्वभमिवर आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन यांनी कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजना व आरोग्य विभाग व ग्रामपंचायत पदाधिकारांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी केंद्रिय पथक आज (बुधवारी) दुपारी उरुळी कांचन ला येणार असल्याची माहिती उरुळी कांचनच्या सरपंच जयश्री वनारसे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronaaffected women in contact with others