कोरोनाचा ख्रिसमस व न्यू इअर सेलिब्रेशनसह हॉटेल व्यावसायावरही मोठा परिणाम?

कोरोनाचा ख्रिसमस व न्यू इअर सेलिब्रेशनसह हॉटेल व्यावसायावरही मोठा परिणाम?

पुणे ः ख्रिसमस व न्यू इअरचे सेलिब्रेशन गेल्या वर्षाएवढे जोरात होणार नाही याची कल्पना आहे. मात्र चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. त्यासाठी आवश्‍यक असलेले नियोजन आणि खरेदी देखील केली होती. अतिरिक्त कामगार देखील बोलावून घेतले आहेत. मात्र संचारबंदीच्या नियमांमुळे हा सर्व खर्च व्यर्थ ठरला आणि अपेक्षित व्यवसाय देखील होणार नाही, अशी खदखद हॉटेल व्यावसायिक जवाहर चोरगे यांनी व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रिटनमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आले. त्यामुळे संचारबंदीच्या काळात ख्रिसमस व न्यू इअरचे सेलिब्रेशन करता येणार नाही. ब-याचदा हे सेलिब्रेशन हॉटेलमध्ये करण्यात येते. त्यामुळे 24 ते 31 डिसेंबर दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार चालकांचा व्यवसाय वाढत असतो. मात्र यंदा त्या सर्वांवर संचारबंदीने पाणी फेरले आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करीत लॉकडाऊन काळात हॉटेल सुरू करण्यास अत्यंत उशिराने परवानगी देण्यात आली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक हतबल झाले होते. त्यानंतर अनेक निर्बंधांसह हॉटेल सुरू झाले. दिवाळीच्या पूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा अच्छे दिन येण्यास सुरवात झाली होती. दिवाळीनंतर तर परिस्थितीत आणखी सुधार झाला होता. मात्र आता सेलिब्रेशन काळातच हॉटेलमध्ये जाण्यास बंदी राहणार असल्याने व्यावसायिकांचा सुमारे 15 टक्के व्यवसाय कमी होणार आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने दिली.

हॉटेल व्यावसायिकांचे मार्चपासून झालेले नुकसान कधीही न भरून येण्यासारखे आहे. त्यातून आम्ही बाहेर पडत नाही तोच संचारबंदी करण्यात आली. उभारी घेत असताना आम्ही पुन्हा एकदा अडचणी आलो आहोत. या निर्णयाची झळ पुढील किमान तीन महिने सोसावी लागेल. अनेकांना हॉटेलचा खर्च भागवून भाडे देणे देखील मुश्‍कील आहे. हॉटेल व्यावसायिकांची उत्पादन शुल्क फी कमी करावी आणि हॉटेलसाठी संचारबंदी रात्री 12 नंतर लागू करावी, अशी आमची मागणी आहे.-बाळासाहेब अमराळे, अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी व्यापारी सेल

असा होणार परिणाम ः
- व्यवसाय किमान 15 टक्‍क्‍यांनी कमी होणार
- ख्रिसमस व न्यू इअरसाठी केलेल्या तयारीवर पाणी फिरले
- तयारीबाबत केलेल्या खरेदीचा खर्च वाया जाणार
- अनेकांना मिळणारा रोजगार बुडाला
- हॉटेलवर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांनाही फटका

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com