कोरोनाने मृत झालेला मृतदेह दोन दिवस बेवारस पडून; वैद्यकीय अधिकारी फोनच उचलेना

Dead-Body
Dead-Body
Updated on

शिक्रापूर - गेल्या दोन दिवसांपासून शिक्रापूरातील एका खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू पावलेल्या एका महिलेचा मृतदेह तसाच पडून असून सदर महिलेचे नातेवाईकांना हा मृतदेह ताब्यात घ्यायला कुठलीही शासकीय यंत्रणा उपलब्ध होईना. याबाबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी कुणाही नातेवाईंचा फोन गेल्या दोन दिवसांपासून अटेंड करीत नसल्याने हा मृतदेह अक्षरश: खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना विनंती करुन आईस बॉक्समध्ये ठेवावा लागला आहे. दरम्यान या घटनेला संबंधित खाजगी रुग्णालयाने दुजोरा दिला असून याबाबत आता महसूल विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत संबंधित मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी. दोन दिवसांपूर्वी बुधवारी (दि.२९) रांजणगाव-गणपती (ता.शिरूर) येथील एका खाजगी रुग्णालयात आमची नातेवाईक ५५ वर्षीय महिला आजारी पडल्याने तिला दाखल केले होते. सदर महिलेचा कोरोना पॉजिटिव्ह रिपोर्ट आला आणि तिची तब्बेतही आणखी खराब होवू लागली. याबाबत आम्ही शासकीय यंत्रणेला कळवून सदर मृतदेह शिक्रापूरातील एका खाजगी रुग्णालयात गुरुवारी (दि.३०) दाखल केला. मात्र येथे तिला दाखल करताच काही वेळातच तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याबाबत आम्ही व संबंधित रुग्णालयाने तात्काळ तळेगाव-ढमढेरे (ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा घोरपडे यांना संपर्क केला पण त्या गेल्या दोन दिवसांपासून फोनच उललत नाहीत. 

याबाबतीत संबंधित रुग्णालयाने सांगितले की, या प्रकरणी तहसिलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचेपर्यंत आता पाठपूरावा आम्ही करणार आहोत. आम्हाला या महिलेचा अंत्यविधी शिक्रापूरातच करायचा आहे मात्र काहीच निर्णय घेता येईना आणि कुणीच प्रतिसाद देईनात त्यामुळे आम्ही हैरान आहोत असे संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान डॉ.घोरपडे व डॉ.शिंदे यांना वारंवार सकाळ प्रतिनिधीने संपर्क केला तरी दोघांनीही प्रतिसाद दिला नाही.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com