Coronavirus : मोठी बातमी : पिंपरी चिंचवडमध्ये आता राहिले फक्त नऊच रुग्ण

YCM
YCM
Updated on

पिंपरी - शहरातील कोरोना बाधित 12 रुग्णांपैकी पहिल्या तीन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले. आज शुक्रवारी (ता. 27) वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच, त्यांना पुढील 14 दिवस होमकोरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.  त्यांना टाळ्या वाजवून वाय सी एम मधून निरोप देण्यात आला.

दरम्यान, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते  नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, डॉ.वाबळे, डॉ. सोहनी यांनी या तीनही व्यक्तींना निरोगी आयुष्य जगण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, महापालिका पदाधिकारी, आयुक्त, वायसीएम रुग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार यांचे रुग्णांनी आभार मानले. शहरावरील संकट अजून टळलेले नसून नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, आपली सुरक्षा आपल्याच हाती असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. शहरात सहा दिवसामध्ये कुठलाही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. ही सुखद बाब असून महापालिका यंत्रणा कायम आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. तरी, घराबाहेर कोणीही पडू नये, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Atul Save and Yogesh Tilekar
Accommodation, food, sanitation and rain-related arrangements have been strengthened to facilitate thousands of Warkaris.
Savitribai Phule Pune University announced the revised schedule to ensure that candidates do not miss the SET examination.
Major Pune Roads to Close this Thursday
Marathi News Esakal
www.esakal.com