esakal | धक्कादायक : बारामतीत सापडला कोरोना रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus baramati auto driver got positive covid19

या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आले असून त्यांचीही वैद्यकीय तपासणी करून त्यांनाही चौदा दिवस होम कोरोंटाईन केले जाणार आहे.

धक्कादायक : बारामतीत सापडला कोरोना रुग्ण 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बारामती Coronavirus : शहरातील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. ससून रुग्णालय व बी.जे. मेडीकल कॉलेजने संबंधित रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल दिल्यानंतर आता प्रशासनाने उपाययोजनांना युध्दपातळीवर प्रारंभ केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले बारामतीत?
शहरातील एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज त्याच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. दरम्यान बारामती नगरपालिका व आरोग्य विभागाने संबंधित रुग्णाच्या घराच्या आसपासचा जवळपास तीन किलोमीटरचा परिसर सील केला आहे. या परिसरातील प्रत्येक कुटुंबाचे वैद्यकीय सर्वेक्षण केले जाणार असून, या परिसरात पुन्हा नव्याने निर्जतुंकीकरण केले जाणार आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आले असून त्यांचीही वैद्यकीय तपासणी करून त्यांनाही चौदा दिवस होम कोरोंटाईन केले जाणार आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी बनविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आणखी वाचा - स्पेनमध्ये परिस्थिती बिघडली; वाचा काय घडले? 

श्रीराम नगर हे केंद्र धरुन 3 किलोमीटर परिसरात क्वारंटाईन झोन म्हणून व तेच केंद्र धरुन 5 किलोमीटर परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात येणार असून, अत्यावश्यक सेवा यांना यातून वगळले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय  बाहेर पडू नये. क्वारंटाईन झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली असून तेथुन सर्व वाहने तपासणी करून सोडण्यात येतील.
- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती..

आणखी वाचा - ब्रिटनमध्ये जूनपर्यंत राहणार लॉक डाऊन

बारामतीकरांनो घराबाहेर पडू नका
कोरोनाचा पहिला रुग्ण बारामतीत आढळला असल्याने बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये, स्वताःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासनाच्या वतीने देण्यात येणा-या सूचनांचे पालन करावे, गर्दी टाळून पोलिसांना सहकार्य करावे. शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत असून त्याला बारामतीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

loading image