कोरोनाच्या लढ्यात 'फर्ग्युसन'ही झालं सहभागी; होस्टेलमध्ये उभारणार कोविड केअर सेंटर!

Fergusson College Boy's Hostel
Fergusson College Boy's Hostel

पुणे -  शहरातील प्रख्यात फर्ग्युसन महाविद्यालयाने कोविड केअर सेंटरसाठी मुलांच्या वसतिगृहाच्या चार इमारती महापालिकेला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सुमारे 350 रुग्णांची तेथे व्यवस्था होणार आहे. 

फर्ग्युसन रस्त्यावर कॉलेजच्या वसतिगृहाच्या चार इमारती आहेत. त्यात सुमारे 200 खोल्या आहेत. तेथे कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मोठ्या असलेल्या खोल्यांत दोन रुग्ण ठेवता येतील तर, काही खोल्यांत एक रुग्ण ठेवता येणार आहे. वसतिगृहात महापालिकेने गाद्या आणून, सेंटर उभारणीस प्रारंभ केला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत हे सेंटर कार्यान्वित होईल, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. 

या बाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे म्हणाले, ""कोरोनाची आपत्ती हे राष्ट्रीय संकट आहे. त्यामुळे प्रशासनाला जी काही मदत लागेल, त्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी तत्पर आहे. याच भावनेतून वसतिगृहाची इमारत आम्ही उपलब्ध करून दिली आहे. या पूर्वीही टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, शनिवार पेठेतील रानडे बालक मंदिर कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.'' 

येथील रुग्ण बाहेर पडणार नाही, म्हणजे परिसरातील रहिवाशांना त्याचा उपद्रव होणार नाही, याची काळजी महापालिकेला घेण्यास सांगितले असून, त्यांनी त्याची दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे. हे सेंटर लवकर सुरू करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे, असे नगरसेवक आदित्य माळवे आणि वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य संदीप काळे यांनी सांगितले. 

लॉकडाऊनमध्येही 'ते' करत होते दारुची विक्री; तब्बल 'एवढा' मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त!​

पाच हजार रुग्णांची व्यवस्था शक्‍य 
शहरात सुमारे 300 महाविद्यालये आहेत. त्यातील बहुतेक महाविद्यालयांची वसतिगृहे आहेत. त्यात किमान 5 हजार कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारता येईल. त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच संबंधित महाविद्यालयांशी चर्चा सुरू आहे, असेही महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) वसतिगृहात गेल्या पाच दिवसांपासून कोविड केअर सेंटर सुरू असून, त्यात सुमारे 600 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले. 

(Edited by- Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com