esakal | Coronavirus : अतिउत्साहींचा अतिरेक; हेतूलाच हरताळ
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवार पेठ - कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींसाठी अभिवादन करताना काही अतिउत्साही नागरिकांनी रस्त्यावर केलेली गर्दी.

एकमेकांशी येणारा संपर्क टाळावा, ‘कोरोना’चा प्रसार कमी व्हावा, यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला; मात्र सरकारी यंत्रणेला धन्यवाद देण्याच्या वेळेला पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिउत्साही लोकांनी घोळक्‍याने रस्त्यावर उतरून टाळ्या, थाळ्यांसह चक्‍क ताशा वाजविला. काही ठिकाणी फटाके फोडल्याने या उपक्रमाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला.

Coronavirus : अतिउत्साहींचा अतिरेक; हेतूलाच हरताळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - एकमेकांशी येणारा संपर्क टाळावा, ‘कोरोना’चा प्रसार कमी व्हावा, यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला; मात्र सरकारी यंत्रणेला धन्यवाद देण्याच्या वेळेला पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिउत्साही लोकांनी घोळक्‍याने रस्त्यावर उतरून टाळ्या, थाळ्यांसह चक्‍क ताशा वाजविला. काही ठिकाणी फटाके फोडल्याने या उपक्रमाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने साध्या स्वरूपात अभिवादन करण्यात आले; परंतु पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अनेक भागांत पाच वाजता अनेक लोक रस्त्यावर आले. सोसायट्यांच्या खाली जमले. घोळक्‍याने वादन करायला सुरवात केली. देशातील परिस्थिती नाजूक होत असताना अतिउत्साहात वेळेचे भान न ठेवता चौकाचौकात फटाके फोडण्यात आले.

रस्त्यावरील गर्दी वाढण्यास सुरवात झाली, सोसायट्यांच्या बाहेर गप्पांचे फड रंगायला लागल्याचे चित्र दिसले. काही मुले तर दुचाकीवरून थाळी वाजवत रस्त्याने फिरत असल्याचे पाहायला मिळाले. 

रस्त्यावर सुरू असलेल्या या धिंगाण्यामुळे पोलिसांना या अतिउत्साही नागरिकांना जबरदस्तीने पुन्हा घरात जाण्यासाठी सूचना द्याव्या लागल्या.

loading image