esakal | पैसेच नाहीत तर कामगार, हॉटेलच्या जागेच भाडं देणार कोठून?

बोलून बातमी शोधा

Corona
पैसेच नाहीत तर कामगार, हॉटेलच्या जागेचं भाडं देणार कोठून?
sakal_logo
By
महेश जगताप

स्वारगेट : गेल्या वर्षभरापासून कसा तरी तग काढला आत्ता मात्र आवाक्याच्या बाहेर आर्थिक गणित चाललं आहे .ट्रक ड्रायव्हर होतो ते सोडून दोन वर्षांपूर्वी एक छोटं हॉटेल सुरू केलं सुरवातीच्या वर्षभरात चाललही छान मात्र गेल्या वर्षी कोरोना आला आणि सर्वच विस्कटलं. पुन्हा व्यवसायाची आर्थिक गाडी रुळावर येतेय, असं वाटलं पण पुन्हा कोरोनाने थैमान मांडलं. मी महिन्याला तीस हजार रुपये भाडं देतोय. गेले वर्षभर तर मित्रपरिवाराकडून उसने पैसे घेऊन भाडे भरलं. दिवस बदलतील या आशेवर पण कसलं काय? राज्यशाशनाने पार्सल देण्यास मुभा दिली आहे पण जेमतेम दहा हजार रुपयांचे पार्सल विकल जातं. मग तुम्हीच सांगा जेवण बनवण्याचा खर्च, कामगारांचे पगार आणि हॉटेलचं भाडं भरायचं कसं? अशी व्यथा सकाळशी बोलताना हॉटेल व्यवसायिक अंकुश कोंढनकर यांनी मांडली.

कोरोनामुळे इतर व्यवसायाबरोबरच हॉटेल व्यवसाय धारकही प्रचंड अडचणीत आला आहे. नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने हॉटेल मधील जेवणाऐवजी घरीच बनवून खाण्याला पसंती दिली आहे. त्यात लॉकडाऊन केल्याने नागरिक बाहेरच पडत नसल्याने हॉटेल मध्ये कोण येणार? राज्यशासनाने हॉटेल धारकांना जेवण पार्सल देण्यास जरी परवानगी दिली असली तरी पार्सल नेण्याचे फार कमी प्रमाण असल्याने खर्च सुद्धा निघण्याची शक्यता नाही. शहर हे शैक्षणिक हब असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातुन विद्यार्थी वर्ग येथे शिक्षणासाठी येतो .मात्र गेल्या वर्षभरापासून शाळा ,कॉलेज बंद असल्याने घरगुती चालणाऱ्या खानावळी,व हॉटेल व्यावसायिक यांच्यावर निश्चितच फार मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायकांनी परिस्थितीसमोर हात टेकले आहेत.

मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होतो पण या व्यवसायात संधी दिसल्याने उतरलो मात्र गेल्या वर्षभरापासून माझं आर्थिक गणित चुकलं आहे .एक वर्ष झालं तोटा सहन करतोय .जागेच भाडं ,कामगार खर्च ,हॉटेल चालवण्यासाठी लागणार दररोजचा खर्च तर करावाच लागतोय .मग पैसे येतच नसतील तर पैसे देणार कोठून आत्ता पुन्हा अभ्यासाकडे वळावे अशी इच्छा होते

- मंगेश जाधव ( खानावळी चालक )