esakal | पुणेकरांसाठी मोठी बातमी : दुकानांच्या वेळांबाबत पुन्हा नवीन आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown pune city shops time and days information marathi

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दुकाने सुरू करण्याबाबत आज सायंकाळी नव्याने आदेश काढले आहेत.

पुणेकरांसाठी मोठी बातमी : दुकानांच्या वेळांबाबत पुन्हा नवीन आदेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दुकाने सुरू करण्याबाबत आज सायंकाळी नव्याने आदेश काढले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. उर्वरीत क्षेत्रात सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरातील दुकाने सुरू ठेवण्याच्या आदेशावरून यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्व भूमीवर आज नव्याने गायकवाड यांनी हे आदेश काढले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अशी 69 क्षेत्रे निश्चित केली आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून बिगर अत्यावश्यतक सेवा अथवा वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रतिबंधित क्षेत्र वगळून दुकाने अशी सुरू राहतील 

 • सोमवार-इलेक्टॉ-निक साधने, संगणक साहित्य, मोबाईल विक्री, भांड्याची दुकाने 
 • मंगळवार-वाहनांची दुरुस्ती, गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने 
 • बुधवार-इलेक्टॉचनिक साधने, संगणक साहित्य, मोबाईल विक्री, भांड्याची दुकाने 
 • गुरुवार-वाहनांची दुरुस्ती, गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने 
 • शुक्रवार-इलेक्टॉ निक साधने, संगणक साहित्य, मोबाईल विक्री, भांड्याची दुकाने 
 • शनिवार-वाहनांची दुरुस्ती, गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने 
 • रविवार-वाहनांची दुरुस्ती, गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिंग, बांधकाम साहित्य, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने
   
 • या ठिकाणची दुकाने बंद
  लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, अप्पा बळवंत चौक, कुमठेकर चौक, कोंढवा रस्ता, एम. जी. रस्ता, ज्योती हॉटेल ते एनआयबीएम रस्ता.
loading image