esakal | Big Breaking : पुण्याचा 90 टक्के भाग खुला होणार; फक्त हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंध 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown restrictions relaxed 90 percent commissioner shekhar gaikwad

कोरोनामुळे संचारबंदीची बंधने  पाळावी लागणाऱ्या पुण्याच्या नव्वद टक्के भागातील पुणेकरांना येत्या 4 मेपासून सुटकेचा श्वास सोडता येणार आहे.

Big Breaking : पुण्याचा 90 टक्के भाग खुला होणार; फक्त हॉटस्पॉटमध्ये कडक निर्बंध 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे संचारबंदीची बंधने  पाळावी लागणाऱ्या पुण्याच्या नव्वद टक्के भागातील पुणेकरांना येत्या 4 मेपासून सुटकेचा श्वास सोडता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असलेल्या केवळ तीस चौरस किलोमीटर भागापुरतेच कडक निर्बंध लागू राहणार असून उर्वरित सर्व पुण्यातील दुकाने, बांधकामे तसेच उद्योग पुन्हा सुरू होणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबतचा तपशील सांगितला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण शहरच सील करून संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, तिची मुदत 3 मे रोजी संपत असून, आता कोरोनाचा प्रादुर्भाव होत असलेल्या भागापुरतेच निर्बंध ठेवण्यात येणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याचे क्षेत्रफळ सुमारे 330 चौरस किलोमीटर असून त्याची विभागणी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांत करण्यात आली आहे. त्यापैकी भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, कसबा पेठ, विश्रामबागवाडा, ढोेलेपाटील रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या भागांत कोरोना बाधित मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने हे भाग रेड झोनमध्ये आहेत. हा 81 चौरस किलोमीटरचा आहे. मात्र, त्यातील झोपडपट्ट्या आणि काही दाट वस्तीच्या भागांतच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे अशा सर्वाधिक लागण असलेल्या भागाला मायक्रोक्लस्टर असे संबोधून इतर सर्व भागांतील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. हा मायक्रो क्लस्टरचा भाग केवळ तीस किलोमीटरचा असल्याने उरलेल्या तीनशे चौरस किलोमीटर क्षेत्रांमधील निर्बंध हटविले जातील. म्हणजेच नव्वद टक्के पुण्यातील रहिवाशांना आता व्यवहार सुरू करता येणार आहेत. या क्षेत्रातील पुणेकरांना कोणत्याही पासची गरज भासणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेच्या हद्दीलगतचे उद्योग सुरू होणे अपेक्षित आहे. हिंजवडी येथील आयटी कंपन्या तसेच, औषधनिर्मिती, कृषिसंबंधित उद्योग यांचा त्यात समावेश असेल. बांधकाम क्षेत्रातील कामे तसेच मेट्रोची कामेही सुरू होणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परराज्यातील तसेच पुण्याबाहेरील 1800 मजुरांची व्यवस्था पुण्यातील 29 छावण्यांत करण्यात आली आहे. त्यातील राज्यातील 180 मजुरांना ताबडतोबीने त्यांच्या त्यांच्या गावी पाठविले जाईल. ते मजूर सोलापूर, नगर आदी जिल्ह्यांतील आहेत. परराज्यातील मजुरांबाबतचा निर्णय मात्र येत्या 2 दिवसांत येणार असलेल्या सरकारच्या आदेशानंतर घेण्यात येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या 4 मेपासून नेमके काय होणार?
330 चौरस किलोमीटरपैकी केवळ 30 किलोमीटरच्या पुण्यातच निर्बंध ठेवणार
उर्वरित पुणेकरांचे बहुतेक व्यवहार सुरू होतील, त्यांना पासची गरज नाही
दुकाने, बांधकाम क्षेत्र, उद्योग सुरू होणार

loading image
go to top