बिडीसाठी पळाला, पकडून आणल्यावर पोलिसांवर थुंकला आणि मग....

टीम ई-सकाळ
Monday, 20 April 2020

कोथरुडमधील शिवाजी महाराज स्मारकाजवळ पालिकेच्या शाळेत त्यांच्या  राहण्याची व्यवस्था केली आहे.

पुणे Coronavirus : संचारबंदी असल्याने पोलिसांनी केलेल्या निवारा केंद्रात बिडी मिळत नसल्याने एका तरुणाने तेथून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पुन्हा निवास केंद्रात दाखल केले. दरम्यान, त्याला पकडून आणताना तो नागरीक, पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांवर थुंकल्याने पोलिसांची त्यास चोप दिला. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता कोथरुड परिसरात घडली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संचारबंदी लागू झाल्याने कोथरुड परिसरात अनेक परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोथरुडमधील शिवाजी महाराज स्मारकाजवळ पालिकेच्या शाळेत त्यांच्या  राहण्याची व्यवस्था केली आहे. कोथरूड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित निवारा केंद्रात ४० जण वास्तव्यास आहेत. तेथे ठेवलेला अमित कुमार हा निवारा केंद्रात बिडी मिळत नसल्याच्या कारणावरून तेथून पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आमच्या बीट मार्शल पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यास पुन्हा निवास केंद्रात आणले. मात्र तो निवारा केंद्रात जाण्यास तयार नव्हता, त्याच्याकडून त्यावेळी नागरीक, पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर थुंकन्याचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी त्यास चोप दिला. अमित कुमार हा बिहारमधील पटणाचा रहिवासी आहे. त्याला गावी जायचे आहे, संचारबंदी संपल्यानंतर पोलिस तुला घरी पोचवतील, असे आम्ही त्याला सांगितल्यानंतर तो शांत झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus man ran away from pune shelter center