esakal | पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा : एका दिवसात शंभरावर कोरोना रुग्ण वाढले; वाचा सविस्तर बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus more than hundred patients within single day pune city

बुधवारी रात्रीपर्यंत एकूण आकडा हा 772 पर्यंत होता. त्यात गुरुवारी नव्याने 104 जणांची भर पडून ही संख्या 876 इतकी झाली आहे.

पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा : एका दिवसात शंभरावर कोरोना रुग्ण वाढले; वाचा सविस्तर बातमी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे Coronavirus : पुण्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांचया आकड्याने शंभरी पार केली असून, दिवसभरात 104 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या पावणेनऊशे इतकी झाली आहे. गेल्या सव्वामहिन्यांत पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने पुणेकर पुन्हा धास्तावले आहेत. त्याचवेळी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे; तर 36 जणांची प्रकृती गंभीर आहे. कोरोनामुक्त झालेल्या आठ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शहरातील नव्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून, त्यात गेल्या तीन दिवसांत 186 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत एकूण आकडा हा 772 पर्यंत होता. त्यात गुरुवारी नव्याने 104 जणांची भर पडून ही संख्या 876 इतकी झाली आहे. सध्या शहरातील विशेषत: पेठांमधील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी केल्या जाणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यानेच कोरोनाचे रुग्ण पुढे येत आहेत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 36 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पर्वती दर्शन येथील 41 वर्षांच्या पुरुषाचाही मृत्यू झाला असून, त्यांना त्रास होत असल्याने बुधवारी (ता.22) ससूनमध्ये दाखल केले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना उच्चरक्तदाब, मधुमेह आणि हदयाचा त्रास होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यात गुरुवारी सापडलेले रुग्ण - 104

एकूण रुग्ण - 876

बरे झालेले रुग्ण - 8

बरे झालेले एकूण रुग्ण - 130

मृत - 4

एकूण मृत - 59

कोरोनाचे एकूण रुग्ण - 876

त्यौपकी मृत्यू झालेले रुग्ण - 59

बरे झालेले एकूण रुग्ण - 130

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - 684

loading image