esakal | बारामती : वृत्तपत्रे विकत घ्या; त्याने कोरोना होत नाही : प्रांताधिकारी कांबळे
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती : वृत्तपत्रे विकत घ्या; त्याने कोरोना होत नाही : प्रांताधिकारी कांबळे

- वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही ही बाब स्पष्ट झाली

- वाचकांनी वृत्तपत्र घरी विकत घेण्यास हरकत नाही

बारामती : वृत्तपत्रे विकत घ्या; त्याने कोरोना होत नाही : प्रांताधिकारी कांबळे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही ही बाब स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे वाचकांनी वृत्तपत्र घरी विकत घेण्यास हरकत नाही, याबाबत आम्हीही शासकीय स्तरावर परिपत्रक काढणार आहोत, अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ माध्यम समूह व उद्योजक रवींद्र (आबा) काळे यांच्या वतीने बारामती शहर व तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मंगळवारी (ता. 26) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी दादासाहेब कांबळे बोलत होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उद्योजक रवींद्र काळे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे, दीपक बनकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दादासाहेब कांबळे म्हणाले, आमच्या करिअरच्या जडणघडणीमध्ये वृत्तपत्र स्टॉल्सचे योगदान मोठे आहे. वृत्तपत्रे व स्पर्धा परिक्षांची पुस्तके पाहून वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो, त्यातूनच स्पर्धा परिक्षांची गोडी लागली व आज अधिकारी बनलो आहोत. वृत्तपत्रांमुळे कोरोना होत नाही हे स्पष्ट झालेले असून नागरिकांनी विनाकारण भीती मनात बाळगू नये. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्व समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे म्हणाल्या, वृत्तपत्रांमुळे सामाजिक परिवर्तन होते, वृत्तपत्र विक्रेत्यांची या प्रक्रीयेतील भूमिका मोठी आहे,  अडचणीच्या काळात रवींद्र काळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत शंभरहून अधिक किट विक्रेत्यांना दिल्या ही बाब दिलासादायक आहे. 

रवींद्र काळे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांपुढे लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्याचे समजल्यानंतर तातडीने त्यांना मदत करण्यासाठी किट दिले. वृत्तपत्र विक्रेत्यांना या पुढील काळात निश्चित मदत केली जाईल. 

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने संतराम घुमटकर यांनी रवींद्र काळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शासन स्तरावर वृत्तपत्रांपासून कोरोना होत नाही या बाबतचे परिपत्रक जारी करणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विजय सणस, संतराम घुमटकर, फय्याज शेख, सूरज चव्हाण, शाम राऊत, मच्छिंद्र सायकर, अप्पा घुमटकर, पोपट म्हेत्रे, दत्तात्रय कुंभार, बापू गायकवाड, प्रभाकर लांडगे, प्रकाश शिंदे, रमेश दुधाळ यांच्यासह अनेक वृत्तपत्र विक्रेते या प्रसंगी उपस्थित होते. 

कल्याण पाचांगणे यांनी प्रास्ताविक केले, मनोज काकडे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद संगई यांनी स्वागत केले. जाहिरात व्यवस्थापक घनशाम केळकर, संजय घोरपडे, महादेव जाधव हेही उपस्थित होते.