Coronavirus : कोरोनाबाबत पुणे विद्यापीठ सतर्क; दिल्या अशा सूचना...

Coronavirus : कोरोनाबाबत पुणे विद्यापीठ सतर्क; दिल्या अशा सूचना...

पुणे : पुणे विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. शिवाय महाविद्यालयांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घालण्यास सुरूवात केली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने खबरदारीचे पाऊल उचलले आहेत.

भारतात कोरोनाच्या प्रसारावर प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असताना परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यातही त्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या प्रवेशद्वारावर काय करावे, काय टाळावे याचे माहिती लावण्यात आली असून, गेटवर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कोरोनाची सर्व माहिती देण्यात आली असून, परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीशी भेटायला गेल्यानंतर हस्तांदोलन, गळाभेट टाळाच याची विशेष सूचना दिली आहे. शिवाय भारतातील स्थिती सामान्य असल्याचेही त्यांच्या पालकांना कळविण्यात आले आहे, असे आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी सांगितले.

...तर नवीन प्रवेशास मुदतवाढ

सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मार्च-एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत असल्याने ते स्वदेशात जाणार नाहीत. तर नवीन वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती पूर्ण होऊन, जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नवे विद्यार्थी पुण्यात येतील. तो पर्यंत "कोरोना'चा प्रभाव कमी झाला नाही तर प्रवेशास मुदतवाढ दिली जाईल, असे खरे यांनी सांगितले

पुण्यात शिकणारे परदेशी विद्यार्थी - 5000
पुणे विद्यापीठातील परदेशीत विद्यार्थी - 150
2019-20 मध्ये प्रवेश झालेले विद्यार्थी - 569
मुले - 368 मुली - 231


विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना

- वारंवार हात स्वच्छ धुवा
- अस्वच्छ हात चेहऱ्याला लावू नका
- संवाद साधताना व्यक्तीपासून अंतर ठेवा
- आजारी असल्यास त्वरीत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्या
- मास्कचा वापर करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com