
प्रथमतः फ्रान्समध्ये काय घडले ते बघू. पॅरिस शहरातील एका हॉस्पिटलमध्ये एक सर्वे करण्यात आला. 343 कोरोना बाधित रुग्णांपैकी 139 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य प्रकारची होती.
तंबाखुमुळं खरच कोरोना पळून जातो? वाचा शास्त्रज्ञांचे म्हणणे
पुणे Coronavirus : तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोग होतो, असे आपण ऐकले असेल. पण कोरोनाचा प्रसार थांबतो हे मात्र पाहिल्यादी ऐकले असेल. फ्रांसमध्ये नुकतेच तंबाखूतील निकोटिनचे नियमित सेवन करणाऱ्याना कोरोनाची लागण तुलनेने कमी प्रमाणात झाल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच, निकोटिन विसानुरोधक असून ते उपयोगात येऊ शकते असे काही शोधनिबंध सांगत आहे. नक्की निकोटिन काय करते आणि त्याचा खरच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपयोग होतोय?
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रथमतः फ्रान्समध्ये काय घडले ते बघू. पॅरिस शहरातील एका हॉस्पिटलमध्ये एक सर्वे करण्यात आला. 343 कोरोना बाधित रुग्णांपैकी 139 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य प्रकारची होती. पुढे अजून पाहणी केल्यावर असे लक्षात आले की, त्यामध्ये धूम्रपान (स्मोकिंग) करणाऱ्यांची संख्या सर्वात कमी होती. फ्रान्समध्ये धूम्रपान करणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के आहे. संशोधक जहिर अमोरा म्हणाले,'यापैकी फक्त 5 टक्के धूम्रपान करणारे होते'. चीन आणि इंग्लंडमध्येही धूम्रपान करणाऱ्यांना तुलनेने कमी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे म्हटले आहे. एवढंच काय तर पुण्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये विडीकामगारांची संख्या जवळ जवळ नगण्य असल्याचा दावा, रघुनाथ येमुल करत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नक्की तथ्य काय?
- निकोटींचे म्हणजेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग का होत नाही, याचे शास्त्रीय विश्लेषण अजून उपलब्ध नाही. समोर आलेले संशोधन फक्त संख्येच्या अभ्यासावर आहे.
- या संशोधनात निकोटिन पेशींमधील रंध्रच बंद करत असल्याचे सांगत आहे. त्यामुले कोविड-१९च्या विषाणूला पेशींमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे म्हटले आहे. पण याबद्दल प्रत्यक्ष वौज्ञानिक चाचणी अजून घेण्यात आली नाही.
- शास्रज्ञाच्या वतीने निकोटिनच्या उपयोगासंबंधी कोरोनाबाधितांवर चाचणी घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. जेंव्हा ही क्लिनिकल ट्रायल पूर्ण होईल तेंव्हाच नक्की निकोटिनच उपयोगात येते का नाही? तसेच त्याचे साईडइफेस्ट ही समोर येतील.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी केवळ निकोटिननाही तर त्यासोबत काही हर्बल तेलाचा वापर करावा लागेल. तसेच निकोटिनचे रासायनिक स्वरूपही निश्चित करावे लागेल. याकडे अजून वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे अधिक गरजेचे आहे.
- डॉ.व्ही.व्ही. कुलकर्णी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, विषाणू अभ्यासक.