'तानाजी'च्या टीमने सिंहगड संवर्धनाची जबाबदारी घ्यावी : मानकर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

चित्रपटाच्या माध्यमातून आपण तानाजी मालुसरे यांचे शौर्य आणि पराक्रम देशभरात पोहोचविला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.तान्हाजी मालुसरे यांनी पराक्रम गाजविला सिंहगड पुण्याच्या जवळच आहे.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे लढवय्ये सरदार तानाजी मालुसरे यांच्या जीवानावर आधारित "तानाजी' चित्रपट सरकारने करमुक्त केला असून, त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने सिंहगडाच्या संरक्षणाची, संवर्धनाची आणि जनताची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अजय देवण यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात तान्हाजी चित्रपटाच्या टीमने सिंहगड दत्तक घ्यावा, असे मानकर यांनी सूचित केले आहे. 

चित्रपटाच्या माध्यमातून आपण तानाजी मालुसरे यांचे शौर्य आणि पराक्रम देशभरात पोहोचविला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.तान्हाजी मालुसरे यांनी पराक्रम गाजविला सिंहगड पुण्याच्या जवळच आहे. आपण तानाजी चित्रपटाच्या टीमने सिंहगडाच्या डागडुजीसह त्यावर इतर सेवा-सुविधां उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

हल्ली ऐतिहासिक चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. बाजीराव, पानिपत, तानाजी, फत्तेशिकस्त, फर्जंद आणि येऊ घातलेला हंबीरराव, हे त्यापैकीच काही. अशा चित्रपटांचा मिळणारा प्रतिसादही जबरदस्त आहे. त्यामुळे अशा सर्वच चित्रपटांच्या टीमनी एकेका किल्ल्याची आणि किल्ले संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली तो आदर्श ठरेल आणि इतरांसाठी प्रेरणादायी असेच कार्य असेल. आपण या संदर्भात पुढाकार घेऊन सिंहगडाच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे आम्हाला वाटते, असेही मानकर यांनी पत्रात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporater Deepak Mankar demands Singhgad Fort conservation