pune municipal corporation
sakal
पुणे - शहराच्या काही भागांमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पाण्याच्या समस्यांच्या जोरदार पाढा वाचत नगरसेवकांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनास धारेवर धरले. १०-१५ दिवसांपासून अपुरा तसेच कमी दाबाने येणारे पाणी, अनेक भागांमध्ये होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि अनियमित पाणी पुरवठा, अशा प्रकारे तक्रारी मांडत संताप व्यक्त केला. जुन्या नगरसेवकांबरोबरच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनीही आपल्या भागातील प्रश्नावर आवाज उठविला.