Narendra Modi
Narendra ModiSakal

मोदींच्या कार्यक्रमाला पुणे महापालिकेतील नगरसेवक राहणार उपस्थित

पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Summary

पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यात (Tour) पुणे महापालिकेतील (Pune Municipal) कार्यक्रमासाठी (Program) उपस्थितीचे (Presenty) बंधन घालण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या कार्यक्रमाला नगरसेवकांना (Corporator) उपस्थित राहता येणार नसल्याने निर्माण झालेली नाराजी व राजकारण (Politics) पेटण्याची शक्यता गृहीत धरून उपस्थितीची मर्यादा २५० जणांपर्यंत वाढविण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी यास दुजोरा दिला.

पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी महापालिकेत आल्यानंतर या पुतळ्याचे लोकार्पण करून १० मिनिटात महापालिकेतून बाहेर पडणार आहेत. महापालिकेत उपलब्ध असलेली जागा व पंतप्रधानांचा ताफा याचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्या २५ ते ३० जणांच्या उपस्थितीत कार्यक्रम केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र, पुणे महापालिकेचा कार्यक्रम असल्याने यास नगरसेवकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देणे आवश्‍यक असते. यामध्ये सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्याही नगरसेवकांना निमंत्रण पाठवले जाते. निमंत्रण देण्यात भेदभाव झाल्यास त्यावरून पुन्हा राजकारण होण्याची नामुष्की ओढवते.

महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने नरेंद्र मोदी महापालिकेत येणार असल्याने यावेळी उपस्थित राहता आले पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू देण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच महापालिकेचे व्यवस्थेतील अधिकारी, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकर, सजावट, मांडव यासह इतर कामासाठी असलेले कर्मचारी यांना पास दिले जाणार आहेत.

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

महापालिकेच्या कार्यक्रमाला नगरसेवकांना उपस्थित राहता आले पाहिजे, त्यामुळे उपस्थितीचे बंधन कमी केले आहे. नगरसेवक, अधिकारी व कार्यक्रमाशी संबंधित कर्मचारी असे सुमारे २०० ते २५० जणांचे स्वतंत्र पास असतील, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

दोन्ही कार्यक्रमांना उपस्थिती अशक्य

महापालिकेतील कार्यक्रम संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा ताफा कर्वे रस्त्यावर जाणार आहे. तेथून मोदी मेट्रोने प्रवास करून आनंदनगर येथे जातील, त्यानंतर ते कारने जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहेत. भाजपने याठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. असे असताना जे नगरसेवक महापालिकेतील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांना सभेलाही पोहोंचणे अशक्य होणार आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com