Pune : कापसाची आयात होणार दुप्पट: ‘सीएआय’चा अंदाज; देशातील उत्पादन २९१ लाख गाठींवरच स्थिरावले
गेल्या महिन्यात २९४ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज होता महाराष्ट्रातील उत्पादनात घट स्पष्ट झाल्याने देशाच्या उत्पादनाचा अंदाजही कमी करण्यात आला. देशातील कापूस वापर ३१५ लाख गाठींवर राहणार आहे. म्हणजेच देशात कापसाला मागणी आहे.
CAI estimates cotton production at 291 lakh bales this season—imports expected to double due to domestic shortfall.Sakal
पुणे : देशातील कापूस उत्पादन २९१ लाख गाठींवरच स्थिरावले आहे. मात्र उद्योगांचा कापूस वापर कायम आहे. चालू हंगामात कापसाची आयात दुपटीहून अधिक वाढेल आणि ३३ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २५ लाख गाठी कापूस भारतात आला.