

कापसाला प्रति क्विंटल
१२ हजार रुपये भाव द्या
शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची शासनाकडे मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
वर्धा : उत्पादन खर्च, हवामानातील प्रतिकूलता आणि शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात घेता कापसाला प्रति क्विंटल किमान १२ हजार रुपये भाव द्यावा. तसेच कापसाच्या आयात धोरणात शेतकरी हिताला प्राधान्य देऊन भाव घसरल्यास मोठ्या प्रमाणात सरकारी खरेदी सुरू करावी, अशी मागणी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
देशात यंदा कापूस उत्पादन २९० लाख गाठींपेक्षा कमी राहण्याचा तर वस्त्रोद्योगाची मागणी ३४० लाख गाठींपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी कापूस आयात वाढविण्याचा विचार सुरू आहे. केंद्र सरकारने यापूर्वी १ जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान कापूस आयातीवरील ११ टक्के सीमाशुल्क माफ केले होते. ही सवलत डिसेंबरपर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू असल्याने देशांतर्गत कापसाच्या दरावर दबाव येण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल ९ हजार ते ९ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत आयात धोरणामुळे भाव घसरल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.