Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

पुणे शहरातील पाणीटंचाई गंभीर बनली आहे. खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे.
Pune Municipal Corporation water tanker

Pune Municipal Corporation water tanker

sakal

Updated on

पुणे - शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी टँकर चालकांकडून नागरिकांची होत असलेली लूट, टँकर भरणा केंद्रांवरील कथित गैरव्यवहार आणि प्रशासनाची निष्क्रियता यावरून पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला चांगलेच धारेवर धरले. 'महापालिकेचे कर्मचारी पैसे मागतात, खासगी टँकर चालक पाच-पाच हजार रुपये घेत आहेत, अधिकारी फोनही उचलत नाहीत. शहरात सर्वत्र टँकर माफियांचे राज्य आहे,' अशा शब्दांत प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com