esakal | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हेल्पलाईन जारी करण्यात आहे. सप्टेंबर महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून, या कालावधीत विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि परिक्षेविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुणे विभागीय मंडळाने हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. यासंबंधी विभागीय सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) गुरुवार (ता. १६) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) (ता. २२ ) पासून सुरू होत आहे. परीक्षेतील अडचणी आणि समस्यांसंबंधी विद्यार्थी आणि पालकांना या हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार : छगन भुजबळ

हेल्पलाइन :

संपर्काची वेळ : सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.००

परीक्षेच्या काळात समुपदेशन : सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.००

इयत्ता १२ वी : ७५८८०४८६५०,

इयत्ता १० वी : ९४२३०४२६२७

समुपदेशन (फक्त परीक्षा कालावधी) :

पुणे : संदीप शिंदे : 9822686815,

अहमदनगर : एस.एल. कानडे : 9028027353

सोलापूर : पी.एस. तोरणे : 9960002957

loading image
go to top