कोरोनातून बरे झालेल्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करणार 

coronavirus
coronavirus

पुणे - कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासोबतच आवश्‍यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोस्ट कोविड व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षित डॉक्‍टरांचे पथक नेमण्यात येणार असून, त्यांच्याकडून रुग्णांचे समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे विभागात आतापर्यंत तीन लाख 35 हजार रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. पुणे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख 28 हजार इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांवर औषधाचा विपरीत होण्याची शक्‍यता असते. काही रुग्णांना अन्य उपचारांची गरज भासते. अशा रुग्णांसाठी कटक विद्यापीठाकडून संस्थागत व्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्याने पुण्यातील जम्बो रुग्णालयात, बाणेर आणि नायडू येथील कोविड रुग्णालयात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयात सध्या समुपदेशन केंद्र सुरू आहे. परंतु तेथे आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मोहिमेत आढळले दोन हजार पॉझिटिव्ह 
"माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एक कोटी 10 लाख लोकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यापैकी सुमारे 46 लाख लोकांपर्यंत पोचून सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील 13 लाख 50 हजार, पिंपरी-चिंचवड येथील 12 लाख आणि ग्रामीण भागात सर्वाधिक 20 लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 23 हजार कोरोना संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात दोन हजार 750 नागरिक कोरोना बाधित असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com