Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची मतमोजणी प्रक्रिया सुरु

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

- प्रत्यक्ष मतदानमोजणी प्रक्रिया दुपारी 3 वाजता सुरु होईल.
- वैध-अवैध मतपत्रिकांचे वर्गीकरणाचे काम सध्या सुरु आहे.

पुणे  : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ - 2020 निवडणुकांचे मतदान 1 डिसेंबरला राज्यात पार पडले. आज (ता.3) सकाळी मतमोजणीस  सुरूवात झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी ही पारंपारीक पद्धतीने होणार आहे. 

Live Updates :

- पुणे शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर आघाडीवर
- पुणे शिक्षक मतदार संघातून अरुण लाड आघाडीवर
- प्रत्यक्ष मतदानमोजणी प्रक्रिया दुपारी 3 वाजता सुरु झाली.
- वैध-अवैध मतपत्रिकांचे वर्गीकरणाचे काम सध्या सुरु आहे.
- पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज  क्रिडा संकुल परिसरात मतमोजणीचे कामकाज सुरु आहे.  विभागीय आयुक्त यांनी मतमोजणी कामाबाबात मार्गदर्शन केले आहे.  
-केंद्रीय निवडणूक निरिक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे याठिकाणी  उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्हाधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉं. राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत.

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. 
- मतमोजणीच्या कामासाठी मास्क, सॅनिटाईझर, हँन्ड ग्लोव्हज्,  फेसशिल्ड इ. साहित्याचा सामावेश  असलेले किट देण्यात आले आहे. 
- मतमोजणी प्रक्रिया शांतपणे, सुरळीतपण शांतेत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी  प्रयत्न करण्यात आले आहे
- विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी 57.96 टक्के मतदान झाले. झालेले मतदान विचारात घेतले, तर मोजणीपूर्ण होण्यास किमान 36 तासांचा कालवधी लागणार आहे. 
- पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्‍यक तो मतांचा कोटा एखाद्या उमेदवाराने पूर्ण केला तर कालवधी कमी होईल. प्राधान्यक्रमांच्या मतांवर मोजणी गेली, तर हा कालवधी आणखी वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counting of votes for Pune Graduate Constituency begins