Pune Fraud Case : धायरीत ४२ लाखांची फसवणूक; सुवर्ण भिशीच्या नावाने पैसे, सोने घेऊन दाम्पत्य फरार
Pune News : धायरी येथील ‘श्री ज्वेलर्स’च्या दाम्पत्याने सुवर्ण भिशीच्या आमिषाने ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख रुपयांची फसवणूक केली. २१ तोळे सोन्यासह हे दाम्पत्य फरार झाले असून त्यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे/खडकवासला : सुवर्ण भिशी योजनेच्या आमिषाने धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’ सराफी पेढीच्या मालकाने ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच, २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दहिवाळ दाम्पत्य फरार झाले आहे.