गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या दाम्पत्याला अटक

गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या दाम्पत्याला अटक
Published on

गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या
दाम्पत्याला अटक
अहिल्यानगर, ता. ७ ः गुंतवणुकीवर ५ ते १५ टक्के आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपी राहुल दर्शन जगताप (वय ४४) आणि पी. सॅन्युअल ऊर्फ पायल राहुल जगताप (वय ४०, रा. पुणे) या दाम्पत्याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे विमानतळावरून अटक केली.
योगी महेंद्र सबलोक (रा. कोठला रोड, सर्जेपुरा) व इतर गुंतवणूकदारांना रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझर कंपनीच्या व्यवसायवाढीसाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कमही परत दिली नाही. सबलोक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास सुरू होता. पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार शाहीद शेख, फुरकान शेख, दीपक जाधव, चिमा काळे यांचे पथक संशयितांचा शोध घेत होते. तपासादरम्यान संशयित पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते पुणे विमानतळावरून विमानाने पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने पुणे विमानतळ पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. या कारवाईत राहुल दर्शन जगताप (वय ४४) आणि पायल पी. सॅन्युअल ऊर्फ पायल राहुल जगताप (वय ४०, रा. पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या तपासात या आरोपी दाम्पत्याविरुध्द अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यांसह मुंबई, ठाणे, मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणा येथे गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे दहा गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com