Pune News : टीटीएम’च्या हिशेबाला कंटाळून दाम्पत्याचा घटस्फोट; नाश्ता, सहलीपासून घरखर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीत पतीचा अर्ध्या रकमेचा आग्रह

आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उच्च उत्पन्न गटातील एका दाम्पत्याचा विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच खर्चाच्या सततच्या हिशेबामुळे मोडला संसार.
divorce

divorce

sakal

Updated on

पुणे - आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या उच्च उत्पन्न गटातील एका दाम्पत्याचा विवाहानंतर अवघ्या काही महिन्यांतच खर्चाच्या सततच्या हिशेबामुळे संसार मोडला. नाश्ता, जेवण, भेटवस्तू, पर्यटन आणि घरखर्च अशा प्रत्येक बाबतीत पत्नीने अर्धा खर्च उचलावा, यासाठी पती सातत्याने तगादा लावत. त्यातून परस्परांतील मतभेद टोकाला गेल्यानंतर दोघांनी संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com