Video : आयटीतलं जोडपं करतंय उसाच्या रसाचा धंदा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

उसाचा रस म्हटलं की, खुळखुळणारा घुंगराचा आवाज आणि गुऱ्हाळ आठवते. पण आज कालच्या हायजेनिक आणि फ्रेश फुडचे फॅड असलेल्या जगात गुऱ्हाळाच्या रसाकडे कित्येकांनी पाठ फिरवली आहे. हाच थंडगार, ताजा आणि स्वच्छ उसाचा रस केव्हाही मिळणे तसे अवघडचं. हेच शक्य करून दाखवलं आहे आयटीतील एका जोडप्याने. मिलिंद दातार आणि कीर्ती दातार यांनी ताजा आणि स्वच्छ उसाचा रस देणारा ब्रँड सुरु केला आहे

पुणे : उसाचा रस म्हटलं की, खुळखुळणारा घुंगराचा आवाज आणि गुऱ्हाळ आठवते. पण आज कालच्या हायजेनिक आणि फ्रेश फुडचे फॅड असलेल्या जगात गुऱ्हाळाच्या रसाकडे कित्येकांनी पाठ फिरवली आहे. हाच थंडगार, ताजा आणि स्वच्छ उसाचा रस केव्हाही मिळणे तसे अवघडचं. हेच शक्य करून दाखवलं आहे आयटीतील एका जोडप्याने. मिलिंद दातार आणि कीर्ती दातार यांनी ताजा आणि स्वच्छ उसाचा रस देणारा ब्रँड सुरु केला आहे

चहा, कॉफी, लिंबू पाणी यांचा ब्रँड असून शकतो तर उसाच्या रसाचा का नाही? या विचारातून या जोडप्याने 'केनेक्टर' सुरु केले. आयटीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. सध्या हिंजवडीतील आयटी इंडस्ट्रीतील कॅन्टीनमध्ये ही सेवा सुरु आहे. त्यासाठी त्यांनी गेली ७ वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी हे यंत्र तयार केले आहे. 

ताजा ऊस मिळावा यासाठी रिसर्च करुन त्यांनी दौडमधील ऊसाची निवड केली. केनेक्टकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील खात्रीचे आणि बाजारभावापेक्षा चांगले उत्पन मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वर्षभर ताजा रसा मिळावा या हेतूने त्यांनी उसाच्या साठवणूकीची यंत्रणा निर्माण केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple From IT are doing sugarcane juice business