वाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेबाहेर नारायण महानवर यांची अनवधानाने दुचाकीवर राहिलेली सव्वा लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी किराणा मालाचे व्यावसायिक सूरज केशवलाल शहा यांना आढळली. त्यांनी बँक कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हे पैसे मालकाचा शोध घेऊन त्यांना रोकड परत केले. शहा यांचा हा प्रामाणिकपणा पाहून महानवर दांपत्याच्या डोळ्यांत अश्रू तराळले.